मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीबाबद्दल नवीन अपडेट , डॉक्टरांनी सांगितले नेमके काय झाले?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीबाबद्दल नवीन अपडेट , डॉक्टरांनी सांगितले नेमके काय झाले?
img
दैनिक भ्रमर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  साताऱ्यातील दरे गावी पोहचले असून  त्यांची प्रकृती बरी नसल्याची माहिती समोर आली. दरम्यान, त्यांच्या फॅमिली डॉक्टरांनी आता एकनाथ शिंदे यांना नेमके काय झाले  त्याची माहिती दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ताप आहे. तसेच , सर्दी झाल्यामुळे त्यांच्या घशाला इन्फेक्शन झाले आहे. व्हायरल संक्रमण त्यांना झाले आहे. त्यामुळे त्यांच्यावर घरीच उपचार सुरु केले आहेत. त्यांना सलाइन लावण्यात आली आहे. कालपासून त्यांची प्रकृती बरी नव्हती. आता त्यात बरीच सुधारणा झाली आहे. आज त्यांनी आमच्याशी गप्पाही केल्या. आता चार डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर उपचार करत आहे. ते उद्या मुंबईला जाणार आहे, अशी माहिती त्यांचे फॅमिली डॉक्टर आर. एम. पार्टे यांनी माध्यमांना दिली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group