५ डिसेम्बर २०२३
नुकत्याच झालेल्या तेलंगणा विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाने घवघवीत यश मिळवत बहुमत मिळवले. तेलंगणाच्या निर्मितीपासून सलग दोन वेळा मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या बीआरएस पक्षाचे प्रमुख के. चंद्रशेखर राव यांच्या वर्चस्वाला कॉंग्रेसने जोरदार धक्का दिला. तेलंगणामधील विजयानंतर मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? याबद्दल चर्चा रंगल्या होत्या.
अखेर कॉंग्रेसच्या विजयाचे शिल्पकार रेवंथ रेड्डी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. नुकत्याच तेलंगणा विधानसभा निवडणुकांचे निकाल समोर आले. निवडणुकीत कॉंग्रेसने दणदणीत विजय मिळवला. कॉंग्रेसच्या या ऐतिहासिक विजयात निर्णायक भूमिका होती ती प्रदेशाध्यक्ष रेवंथ रेड्डी यांची. काँग्रेसने 2021 रेवंत यांना मोठी जबाबदारी देत त्यांची तेलंगणा राज्य युनिटचे अध्यक्ष म्हणून निवड केली होती.
त्यामुळेच तेलंगणामधील विजयानंतर मुख्यमंत्रीपदासाठी रेवंथ रेड्डी यांचे नाव आघाडीवर होते. अखेर त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. सात डिसेंबरला त्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे.
Copyright ©2024 Bhramar