रेवंथ रेड्डींनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ; उपमुख्यमंत्र्यांसह ८ मंत्र्याचाही शपथविधी
रेवंथ रेड्डींनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ; उपमुख्यमंत्र्यांसह ८ मंत्र्याचाही शपथविधी
img
Dipali Ghadwaje
नुकत्याच झालेल्या तेलंगणा विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाने घवघवीत यश मिळवत बहुमत मिळवले. तेलंगणाच्या नवीन मुख्यमंत्र्यासह नव्या सरकारमधील मंत्र्यांचा शपथविधी सोहळ आज पार पडला.  आज तेलंगणाचे नवे मुख्यमंत्री म्हणून कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष रेवंथ रेड्डी नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत १ उपमुख्यमंत्री आणि ८ मंत्र्यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला केंद्रीय कॉंग्रेस नेत्यांनी हजेरी लावली.
 
दरम्यान या शपथविधी सोहळ्यासाठी कॉंग्रेस पक्षाकडून काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी आणि प्रियांका गांधी गुरुवारी सकाळी हैदराबादला पोहोचले आहेत. हैदराबाद विमानतळावर या सर्वांचे जोरदार स्वागत करण्यात आले. तसेच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावली.

तेलंगणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ते तेलंगणाचे मुख्यमंत्री बनणाऱ्या रेवंत रेड्डी यांना त्यांचे समर्थक 'टायगर रेवंत' असेही म्हणतात. रेवंथ रेड्डी हे तेलंगणाचे दुसरे मुख्यमंत्री ठरलेत. रेवंथ रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसने या निवडणुकीत बीआरएसच्या वर्चस्वाला धक्का देत तेलंगणाच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच राज्यात सत्ता मिळवली.

 
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group