एकनाथ शिंदे आज मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार? मोठा निर्णय जाहीर करणार?
एकनाथ शिंदे आज मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार? मोठा निर्णय जाहीर करणार?
img
Dipali Ghadwaje
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. महायुतीला २३९ जागा मिळाल्या आहेत.  मात्र आता महायुतीसमोरचा पुढचा पेच आहे मुख्यमंत्री कोण? याचा. दरम्यान आज एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. कारण २६ नोव्हेंबर ही तारीख महाराष्ट्राच्या १४ व्या विधानसभेची शेवटची तारीख आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर आता घडामोडींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे आज मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊ शकतात, अशी माहिती समोर आली आहे. विधानसभेचा आज कार्यकाळ संपतो आहे. अशात शिंदे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती आहे. तसंच महाराष्ट्रात नवीन मुख्यमंत्री शपथ घेईपर्यंत एकनाथ शिंदे हे काळजीवाहू मुख्यमंत्री असणार आहेत.

दरम्यान एकनाथ शिंदे आज मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे आज काय निर्णय घेणार याकडे सर्वांचच लक्ष लागलेलं आहे. शिवाय महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री कोण असणार? याकडेही अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे.

शिंदे मुख्यमंत्रिपदासाठी आग्रही

एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदासाठी आग्रही आहेत. मुख्यमंत्रिपद भाजपला जाणार हे निश्चित असल्याचं बोललं जात आहे. दिल्लीतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निरोप कळवला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. किमान दीड वर्षे मुख्यमंत्री पद द्या, यासाठी एकनाथ शिंदे आग्रही आहेत. एकनाथ शिंदे आज मोठा निर्णय घेणार की महायुतीसोबतच राहणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालेलं असताना अद्यापर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत निर्णय झालेला नाही. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री, भाजपचे वरिष्ठ नेते अमित शाह आतमुंबईत येण्याची शक्यता आहे. अमित शाह आज मुंबईत येऊन मुख्यमंत्रिपदाबाबतची घोषणा करणार असल्याची माहिती आहे.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group