बाटलीत पेट्रोल न दिल्याने , चौघांकडून पंपावरील मॅनेजरला मारहाण
बाटलीत पेट्रोल न दिल्याने , चौघांकडून पंपावरील मॅनेजरला मारहाण
img
DB
नाशिक (प्रतिनिधी) :- बाटलीत पेट्रोल दिले नाही म्हणून चार अनोळखी इसमांनी पेट्रोल पंप कर्मचाऱ्यास लोखंडी वस्तूने मारून दुखापत केल्याची घटना खोडेनगर येथे घडली.

फिर्यादी तुषार बापू पवार (वय 33, रा. सारथी सोसायटी, इंदिरानगर, नाशिक) हे खोडेनगर येथील देवरे पेट्रोल पंप येथे कामाला आहेत. त्यांनी बाटलीत पेट्रोल दिले नाही याचा राग आल्याने चार अज्ञात इसमांनी पवार यांना शिवीगाळ, मारहाण व दमदाटी करून हातातील लोखंडी वस्तूने मारून दुखापत केली. 

या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात चार अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group