विवाहबाह्य संबंधामुळे अनेक कुटुंब उध्वस्त होत आहे. अनैतिक संबंधामुळे वाद , घटस्फोट, साथीदाराची हत्या अशी गंभीर प्रकरण न्यायालयात सुरु आहे. जालन्यात देखील एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
जालन्यात अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या भावाचा भावानेच काटा काढला आहे. जालन्याच्या बदनापूर परिसरात ही धक्कादायक घटना घडली असून यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमठाणा येथील मनिषा तायडे हिचा सख्ख्या लहान दीर ज्ञानेश्वर तायडे याच्यासोबत अनैतिक प्रेमसंबंध होते.
या संबंधांमध्ये पती परमेश्वर राम तायडे (वय 30 वर्ष) हा अडथळा ठरत असल्याने दोघांनी मिळून त्याची हत्या करण्याचे ठरवले. त्यानुसार, 15 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास ज्ञानेश्वर आणि मनिषाने परमेश्वरच्या डोक्यात व चेहऱ्यावर कुऱ्हाडीने वार करून त्याची हत्या केली.
परमेश्वरला एका मोठ्या गोणित भरले व सोमठाणा तलावात आणून फेकले यावेळी त्या गोणीला त्यांनी दोरीच्या सहाय्याने दगड बांधून पाण्यात फेकले, गावात परमेश्वर घरी नसल्याचे चर्चा सुरू झाली अगोदरच यांच्या दोघातील अनैतिक संबंध संपूर्ण गावभर होते. त्यामुळे शंका आणि चर्चेला उधाण आले, तर याची कुणकुण बदनापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना लागली.
या प्रकरणाचा छडा लावला व 12 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास, बदनापूर हद्दीतील निकळज शिवारातील वाल्हा–सोमठाणा तलावात प्लास्टिकच्या मुरघासमध्ये गुंडाळलेले एक अज्ञात प्रेत आढळले. माहिती मिळताच बदनापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला. ओळख पटविल्यावर तो मृतदेह परमेश्वर राम तायडे, सोमठाणा येथे रहिवासी, याचा असल्याचे समोर आले.
या प्रकरणी मयताचे वडील राम नाथा तायडे (वय 56 वर्ष) यांच्या तक्रारीवरून बदनापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात बदनापूर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. ज्ञानेश्वर राम तायडे (वय 28 वर्ष) आणि मनिषा परमेश्वर तायडे (वय 25 वर्ष) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत