खळबळजनक! मतदानाच्या दिवशीच टीएमसी नेत्याची हत्या
खळबळजनक! मतदानाच्या दिवशीच टीएमसी नेत्याची हत्या
img
Dipali Ghadwaje
देशभरातील ९६ लोकसभा मतदार संघांसाठी आज मतदान होत आहे. देशभरात मतदार मतदान केंद्रावर गर्दी करताना दिसत आहेत. अशातच पश्चिम बंगालमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पश्चिम बंगालमध्ये मतदानाच्या दिवशीच तृणमुल काँग्रेसच्या नेत्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदानादरम्यान पश्चिम बंगालमधून मोठी बातमी समोर आली आहे. बंगालमधील पूर्व बर्दवान जिल्ह्यातील केतुग्राममध्ये रविवारी रात्री (१२ मे २०२४) तृणमूल काँग्रेस कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली. मिंटू शेख असे या कार्यकर्त्याचे नाव आहे. त्याच्यावर बॉम्बने हल्ला झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मिंटू शेख निवडणुकीचे काम आटोपून घरी परतत असताना त्यांच्यावर हल्ला झाला. सीपीएम-समर्थकांनी त्यांची हत्या केल्याचा दावा टीएमसी नेतृत्वाने केला आहे. तर टीएमसी पक्षातील गटबाजीतून मिंटू शेखची हत्या झाल्याचा दावा सीपीएमने केला आहे. तसेच जुन्या वैमनस्यातून ही हत्या झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केतुग्राम पीएस अंतर्गत आंखोना ग्रा.पं. चेचुरी गावातील मिंटू दुचाकीवरून जात असताना, त्याच भागातील काही लोकांनी त्याला अडवले. मिंटूने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता त्याच्यावर बॉम्ब फेकण्यात आला, त्यात त्याचा मृत्यू झाला. या हल्लेखोरांना पकडण्यासाठी अनेक ठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत. दरम्यान, या हत्येनंतर परिसरात तणावाचे वातावरण असून मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group