लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजपचे दोन आमदार अडचणीत ; काय आहे नेमकं प्रकरण?
लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजपचे दोन आमदार अडचणीत ; काय आहे नेमकं प्रकरण?
img
Dipali Ghadwaje
मुंबई : मीरा रोड येथे जानेवारीमध्ये उसळलेल्या हिसांचारानंतर भाजपाचे आमदार नितेश राणे, गीता जैन यांनी केलेली भाषणे ही द्वेषपूर्ण असल्याचे मुंबई आणि मिरारोडच्या पोलीस आयुक्तांना सकृतदर्शनी आढळून आले आहे. त्यामुळे, या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती राज्य सरकारने मंगळवारी उच्च न्यायालयात दिली.

मुंबई : राज्यभरात  लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे अशातच लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजप आमदार नितेश राणे आणि आमदार गीता जैन यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी मुंबई उच्च न्यायालयात ही माहिती दिली. दोन्ही आमदारांनी जानेवारी महिन्यात ठाणे जिल्ह्यात भडकाऊ भाषण केल्या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

 मीरा रोड येथे जानेवारीमध्ये उसळलेल्या हिसांचारानंतर भाजपाचे आमदार नितेश राणे, गीता जैन यांनी केलेली भाषणे ही द्वेषपूर्ण असल्याचे मुंबई आणि मिरारोडच्या पोलीस आयुक्तांना सकृतदर्शनी आढळून आले आहे. त्यामुळे, या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती राज्य सरकारने  उच्च न्यायालयात दिली.

न्यायाधीश रेवती माहिते डेरे आणि न्यायाधीश मंजूषा देशपांडे यांच्या खंडपीठाला पोलिसांनी ही माहिती दिली. सरकारी वकील हितेन वेणेगावकर यांनी कोर्टात सांगितले की, मीरा-भाईंदरमध्ये हिंसाचारादरम्यान भाजप आमदार नितेश राणे आणि आमदार गीता जैन यांनी प्रक्षोभक भाषण केले.तसेच राणे यांच्यावर मुंबईतील मालाड येथील मालवणी, मानखुर्द आणि घाटकोपर या भागात रॅलीमध्ये प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप आहे. तर गीता जैन यांच्यावर मीरा-भाईंदरच्या एका रॅलीमध्ये प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप आहे.

पोलिसांनी या प्रकरणी दोन्ही नेत्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम १५३, ५०४, ५०६ या अंतर्गत एफआयआर नोंद केला आहे. मीरा-भाईंदरमधील हिसांचारादरम्यान देखील काही व्यक्तींवर एफआयआरची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सुरु आहे.

१९ जूनला होणार पुढील सुनावणी

मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठापुढे या प्रकरणाची पुढील सुनावणी १९ जूनला होणार आहे. नितेश राणे, गीता जैन आणि तेलंगणाचे आमदार टी. राजा सिंह यांच्याकडून जानेवारीत ठाणे जिल्ह्यातील मीरा रोडमध्ये प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी कारवाईसाठी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. तसेच याचिकेमध्ये प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांविरोधात एफआयआर नोंद करण्याची मागणी करण्यात आली होती.
 

इतर बातम्या
Join Whatsapp Group