भाजपला मोठा धक्का; निवडणुकीआधीच ठाकरे गटाचा बडा नेता स्वगृही परतणार
भाजपला मोठा धक्का; निवडणुकीआधीच ठाकरे गटाचा बडा नेता स्वगृही परतणार
img
DB
राज्यात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. अशात अनेक नेते उमेदवारी मिळवण्यासाठी आग्रही आहेत.अशातच आता धाराशिवमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. निवडणुकीआधीच भाजपमध्ये गेलेले ठाकरे गटाचे बडे नेते पुन्हा स्वगृही परतत आहेत.
 
धाराशिवचे माजी खासदार आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष शिवाजीराव बापू कांबळे यांचा शिवसेना ठाकरे गटात उद्धव ठाकरेंच्या उपस्थित पक्षप्रवेश होणार आहे, अशी माहिती समजतेय. कैलास पाटील यांच्या नेतृत्वात शिवाजीराव कांबळे यांच्यासह भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांचा ठाकरे गटात प्रवेश होणार आहे भोकर येथे उद्धव ठाकरे यांची आज पत्रकार परिषद होणार आहे. 

यावेळी शिवाजीराव बापू कांबळे यांचा ठाकरे गटात पक्षप्रवेश होणार आहे. शिवाजीराव बापू कांबळे हे यापूर्वी शिवसेनेकडून २ टर्म खासदार राहिले आहेत. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. 10 वर्षे राज्य कार्यकारिणीवर त्यांनी काम केलं आहे. त्यानंतर आता ते पुन्हा स्वगृही परतत आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group