नाशिकच्या राजकारणात सर्वात मोठा ट्विस्ट, शांतीगिरी महाराजांनी
नाशिकच्या राजकारणात सर्वात मोठा ट्विस्ट, शांतीगिरी महाराजांनी "या" पक्षाकडून भरला अर्ज
img
Dipali Ghadwaje
महायुतीत नाशिक लोकसभा मतदार संघाचा तिढा कायम असतानाच एक मोठी बातमी समोर येत आहे. अपक्ष निवडणूक लढवत असलेले शांतीगिरी महाराज  यांनी उमेदवारी अर्ज भरताना शिवसेना शिंदेगटाकडून अर्ज भरला आहे. यामुळे नाशकात मोठी खळबळ उडाली आहे. 

शांतीगिरी महाराज हे नाशिकमधून अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याची माहिती होती. त्यांनी आज गोदाघाट येथे आपल्या भक्त परिवारासह जोरदार शक्ती प्रदर्शन केले. त्यानंतर ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. 

मात्र उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांनी शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यामुळे नाशकात मोठी खळबळ उडाली आहे. अद्याप महायुतीकडून अधिकृत उमेदवारीची घोषणा झालेली नाही. मात्र शांतीगिरी महाराज हे महायुतीचे उमेदवार असणार का? याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे. 

शांतीगिरी महाराजांना अद्याप एबी फॉर्म नाही

मात्र अर्जासोबत एबी फॉर्म जोडण्यात आला नाही. महायुतीचा उमेदवार कोण? अशी चर्चा सुरू असतानाच स्वामी शांतिगिरी महाराज यांनी शिंदेंच्या शिवसेनेच्या नावाने अर्ज भरल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शांतीगिरी महाराज यांनी यापूर्वी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. शांतीगिरी महाराज यांनी एकूण चार अर्ज घेतले आहेत. आज दुसरा अर्ज भरण्यात आला आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group