सत्ता स्थापनेनंतर ''या'' कारणाने महायुतीत मतभेद ! नक्की काय घडले?
सत्ता स्थापनेनंतर ''या'' कारणाने महायुतीत मतभेद ! नक्की काय घडले?
img
दैनिक भ्रमर

गुरुवारी राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले असून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. दरम्यान आत महायुतीमधून एक बातमी समोर येते आहे. सरकारनं स्थापन झाल्याच्या काही तासांतच महायुतीमध्ये मतभेद झाले असल्याची माहिती समोर आली आहे. 

कोल्हापुरातील शक्तीपीठ महामार्गाबाबत  महायुतीत मतभिन्नता असल्याचे समोर आले आहे. शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेला हायवे कोल्हापुरातून होऊ देणार नाही, अशी भूमिका हसन मुश्रीफांनी घेतली आहे. तर विरोध नाही तिथून हायवे जाणार, हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आगामी कालावधीत महायुतीतच महामार्गावरुन खटके उडण्याची शक्यता आहे.

हसन मुश्रीफ म्हणाले, शक्तीपीठ कोल्हापूर जिल्ह्यात रद्द झाला आहे. त्याची अधिसूचना देखील देखील निघाली. सांगलीतील शेतकऱ्यांना महामार्ग हवा आहे. सांगलीच्या पुढे कोल्हापूरमार्गे गोव्याला कसे जायचे ते सरकार ठरवेल. परंतु शक्तिपीठ रस्ता कोल्हापूरातून रद्द झाला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, शक्तीपीठ महामार्गाला सांगली जिल्ह्यापर्यंत पूर्णपणे समर्थन आहे. सगळेच शेतकरी आम्हाला सांगतात की आमच्याकडे येऊन सांगतात की तुम्ही भूसंपादन करा. सांगली जिल्ह्यातील भागात त्याला समर्थन आहे. तर कोल्हापूर जिल्हा जिथे सुरू होते तिथे विरोध होत आहे. त्यामुळे आमचा प्रयत्न आहे, असा आहे की जिथपर्यंत विरोध आहे तिथपर्यंत काही काम करायचे आणि जिथे विरोध आहे तिथे सर्वांशी चर्चा करून काही मार्ग काढता येईल का हे पाहणार आहे.कारण शेतकऱ्यांना नाराज करून त्यांच्या जमिनी घेऊन त्यांच्या जमिनी बळकवण्याची आमची मानसिकता नाही..

शक्तिपीठ महामार्ग रद्द व्हावा अशी मागणी सातत्याने होत होती. हा महामार्ग रद्द व्हावा यासाठी अनेक आंदोलने, मोर्चे काढण्यात आले. शेतकऱ्यांनी प्रचंड विरोध केला होता. याचा विचार करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याचा निर्णय घेतला.महामार्गाबाबतची अधिसूचना रद्द करून 15 ऑक्टोबरला राजपत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे.


इतर बातम्या
Join Whatsapp Group