शिंदे गटाला मोठा धक्का..! खंजीर खुपसला.....
शिंदे गटाला मोठा धक्का..! खंजीर खुपसला....."या" नेत्याने पदाधिकाऱ्यांसह दिला सामुहिक राजीनामा
img
Dipali Ghadwaje

राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारांच्या याद्या जाहीर होत असताना  परभणीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे. शिवसेना अल्पसंख्यक विभागाचे प्रदेशाध्यक्ष सईद खान यांनी उमेदवारी मिळाली नसल्याने सर्व पदाधिकाऱ्यांसह आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तर 29 तारखेला राष्ट्रीय समाज पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे जाहीर केले आहे.

दरम्यान अर्ज दाखल करण्यासाठी महादेव जानकर देखील उपस्थित राहणार आहेत. तर आमदार राजेश विटेकर यांनी आपल्या पाठीत खंजीर खुपसला असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांनी मला दोन वर्षे सहकार्य केले मी त्यांच्यावर नाराज नाही असे सईद खान यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.


शिवसेना अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष सईद खान यांना पाथरी मतदारसंघातून उमेदवारी ने मिळाल्याने साधारण 500 पदाधिकाऱ्यांसह आपले राजीनामे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिले आहेत.  महायुतीमध्ये पाथरी विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेल्याने सर्वच शिवसैनिक नाराज असल्याचे सांगितले जात आहे.

सईद खानांसहित पदाधिकाऱ्यांचे सामुहिक राजीनामे

शिवसेना शिंदे गटाचे अल्पसंख्यांक प्रदेश अध्यक्ष सईद खान यांच्यासह पदाधिकारी, जिल्हाधिकारी, तालुकाप्रमुख आणि शहरप्रमुखांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात बंड  पुकारलं आहे.  पाथरी विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी न मिळाल्याने जवळपास ५०० जणांनी आपले सामुहिक राजिनामे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे सुपूर्द केले आहेत.

29 ऑक्टोबरला माझा अर्ज मी भरणार आहे, असं सईद खान यांनी सांगितलं आहे. सईद खान हे शिवसेनेचे नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात. शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. २९ तारखेला महादेव जानकर यांच्या उपस्थितीत अर्ज भरणार असल्याचं त्यांनी सांगितलंय.
 

इतर बातम्या
Join Whatsapp Group