महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्री कोण? या प्रश्नाचे उत्तर अजूनही मिळालेलं नाही. महायुतीतील घटक पक्षांमध्ये मुख्यमंत्री पदासाठी चढाओढ सुरू आहे. अशातच राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज त्यांची भुमिका मांडणार आहे. थोड्याच वेळात दुपारी 3 वाजता ते पत्रकार परिषद घेणार आहे. ते नेमकी काय भुमिका मांडणार याकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
गेल्या तीन दिवसांसून राज्याचे मुख्यमंत्री कोण होणार याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. 3 दिवसानंतर एकनाथ शिंदे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. कोणत्या ऑफर आल्या, कोणत्या ऑफर नाकारल्या, मुख्यमंत्री पदाबाबत नाराजी की नाराजी दूर, अशा सर्व प्रश्नांची उत्तरे थोड्याच वेळात मिळणार आहेत.
दरम्यान, सध्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. त्यामुळं एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे हे दिल्लीत होते. मात्र, ते तातडीनं दिल्लीहून अधिवेशन सोडून मुंबईकडे रवाना झाले आहेत. ते देखील पत्रकार परिषदेला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
एकनाथ शिंदे यांनी अद्याप कोणतीही भूमिका जाहीर केली नव्हती. ते प्रथमच पत्रकार परिषद घेऊन त्यांचा निर्णय जाहीर करणार आहेत. ते नेमकं काय बोलणार याकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.