आई नव्हे, वैरीण! पोटच्या बाळाला धावत्या बसमधून फेकलं ; कुठे घडली घटना?
आई नव्हे, वैरीण! पोटच्या बाळाला धावत्या बसमधून फेकलं ; कुठे घडली घटना?
img
Dipali Ghadwaje
परभणीमध्ये आईनेच आपल्या पोटच्या बाळाचा जीव घेतला. धावत्या बसमधून या महिलेने आपल्या नवजात बाळाला फेकून दिलं. या घटनेमुळे परभणीत खळबळ उडाली आहे. ही घटना पाथरी तालुक्यातील देवनांद्रा शिवारात घडली.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी या बसचा पाठलाग करून बाळाच्या आईला आणि वडिलांना ताब्यात घेतलं. पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

याबाबत  मिळालेल्या माहितीनुसार, परभणीच्या पाथरी तालुक्यातील देवनांद्रा शिवारामध्ये धावत्या बसमधून एका १९ वर्षीय विवाहितेने आपल्या बाळाला फेकून दिलं. पुरुष जातीच्या अर्भकाला या महिलेने बसमधून फेकून दिल्यामुळे एकच खळबळ उडाली.

हा प्रकार एका शेतकऱ्याने पाहिल्यानंतर त्याने याबाबतची माहिती पोलिसांना दिली आणि त्यानंतर पोलिसांनी बसचा पाठलाग केला आणि १९ वर्षीय विवाहिता आणि २१ वर्षीय तिच्या नवऱ्याला ताब्यात घेतले.

आरोपी महिला आणि तिच्या नवऱ्याने पुण्यात आंतरजातीय विवाह केला होता. त्यातच ही १९ वर्षीय विवाहिता गर्भवती राहिली होती. मात्र बसमधून प्रवास करत असताना तिची बसमध्येच प्रस्तुती झाली. पुरुष जातीचे अर्भक मयत जन्माला आले होते. त्यामुळे तिने या अर्भकाला फेकून दिलं असं पोलिसांना सांगितले.

पोलिसांनी या महिलेला उपचारासाठी परभणी येथील रुग्णालयात दाखल केले. या धक्कादायक घटनेप्रकरणी पाथरी पोलिसांनी नवरा-बायकोविरोधात गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी मृत अर्भकाला देखील ताब्यात घेतले आहे. पोलिस या प्रकरणाचा कसून तपास करत आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group