"त्या" प्रकरणानंतर तीव्र पडसाद राज्यभर, आज महाराष्ट्र बंदची हाक
img
Dipali Ghadwaje
परभणीमधील आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. आंबेडकरी अनुयायींकडून महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला आहे.

न्यायालयीन कोठडीमध्ये असताना काल सकाळी सोमनाथ सूर्यवंशीना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना रुग्णालयामध्ये नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

एका माथेफिरूने 10 डिसेंबरला संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केली होती, आणि त्याविरोधात 11 तारखेला आंदोलन करण्यात आलं होतं.

त्याच आंदोलनादरम्यान दगडफेक तसेच तोडफोड झाली होती. दगडफेक केल्याच्या आरोपाखाली सोमनाथ सूर्यवंशी यांना अटक करण्यात आली होती. 14 तारखेला त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं. मात्र काल सकाळी (15 डिसेंबर) सोमनाथ सूर्यवंशी यांचा सकाळी मृत्यू झाला.

त्यानंतर आज आंबेडकरी अनुयायांकडून आज संपूर्ण महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. तसेच अनुयायींनी जिल्हा बंद पुकारला आहे. बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला असून परभणी शहरात जिल्हाधिकारी कार्यालयसमोरील मैदानात आज धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

नेमकं काय घडलं ?

परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे. तेथेच संविधानाची, घटनेची प्रत ठेवण्यात आली होती. गेल्या आठवड्यात मंगळवारी संध्याकाळी एका माथेफिरू इसमाने या संविधानाच्या प्रतीची विटंबना केली. ही घटना समोर येताच शहरातील आंबेडकरी अनुयायी संतापले आणि त्यांनी मंगळवारी संध्याकाळीच रेल्वे रोको तसेच रस्ता रोको केला. तर, दुसऱ्या दिवशी बुधवारी आंबेडकर अनुयायी पुन्हा रस्त्यावर आले. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन अलर्ट मोडवर होतं. पण त्यानंतर परभणीत जाळपोळ झाली, दगडफेकही करण्यात आली. या घटनेनंतर पोलिसांनी काहींना ताब्यात घेतलं होतं. त्यामध्येचे सोमनाथ सूर्यवंशी यांचाही समावेश होता. 14 तारखेलाच सोमनाथ यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली , मात्र काल ( रविवार 15 डिसेंबर) त्यांना न्यायालयीन कोठडीत असतानाचा हृदयविकाराचा झटका आला. रुग्णालयात नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला, असा दावा पोलिसांनी केला आहे.
 
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group