राजकीय वर्तुळात राज ठाकरे अन् उद्धव ठाकरे एकत्र येणार, अशी चर्चा सुरू आहे. यावर आता शरद पवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. पत्रकार परिषदेमध्ये बोलताना शरद पवार म्हणाले की, त्यांचा हा कौटुंबिक प्रश्न आहे, याची मला माहिती नाही. मी याबाबत त्यांच्याशी बोललो नाही, त्यामुळे मी त्याच्यावर कसं बोलणार? अशी तिखट प्रतिक्रिया समोर आली आहे.
राजकीय वर्तुळात पवार कुटुंब एकत्र येणार, अशी देखील चर्चा सुरू आहे. यावर शरद पवार म्हणाले की, जनतेच्या कामानिमित्ताने एकत्र आलो होतो.
सरकारच्या प्रतिनिधीशी बोलणं यामध्ये काही चुकीचं नाही. तर ठाकरे कुटुंबाची राजकीय समीकरणं बदलणार असल्याची चर्चा सुरू असतानाच शरद पवारांनी देखील यावर भाष्य केलंय. हा राज ठाकरे अन् उद्धव ठाकरे यांचा कौंटूंबिक प्रश्न आहे. यासंदर्भात कल्पना नसल्याचं शरद पवारांनी म्हटलंय.