धक्कदायक ! नवऱ्याने बायकोला संपवलं; धारदार शस्त्राने १२ वेळा वार
धक्कदायक ! नवऱ्याने बायकोला संपवलं; धारदार शस्त्राने १२ वेळा वार
img
वैष्णवी सांगळे
परभणीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. धारदार शस्त्राने १२ वेळा वार करत नवऱ्याने बायकोची क्रूर हत्या केली आहे. आरोपीने महिलेच्या पोट आणि छातीवर तब्बल १२ वेळा वार केले. या हल्लयात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा अधिक रक्तस्राव झाल्यामुळे जागीच मृत्यू झाला. 

मिळालेल्या माहितीनुसार,जिंतूर तालुक्यातील सोनपूर तांडा येथे ही धक्कादायक घटना घडली. सोनपूर तांडा येथील शेत शिवारात गुरूवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.  विजय राठोड याने स्वतःची पत्नी विद्या विजय राठोड ( 32 वर्षे) हिच्यावर तीक्ष्ण हत्याराने हल्ला केला.  तिच्या छातीवर आणि पोटावर १२ वेळा वार करण्यात आले. 

वातावरण तापणार ! लक्ष्मण हाकेंची मोठी घोषणा, मनोज जरांगेंना थेट इशारा

या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या झालेल्या महिलेला स्थानिक नागरिकांनी तात्काळ उपचारासाठी जिंतूरच्या ट्रामा केअर सेंटरमध्ये नेले. पण उपचारापूर्वीच डॉक्टरांनी या महिलेला मृत घोषित केले. बायकोची हत्या करून आरोपी पती फरार झाला आहे.  या प्रकरणी परभणीच्या जिंतूर पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी सध्या फरार असून त्याच्या शोधासाठी पोलिसांनी पथके तयार केली आहेत. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group