मुहुर्त ठरला ! अजित पवारांची यादी आजच होणार जाहीर ; वाचा सविस्तर
मुहुर्त ठरला ! अजित पवारांची यादी आजच होणार जाहीर ; वाचा सविस्तर
img
Dipali Ghadwaje
महाराष्ट्रात सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राज्यातील विधानसभा निवडणूक एक महिन्यावर येऊन ठेपली आहे. येत्या 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रातील २८८ मतदारासंघात एकाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे. तर २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर केले जाणार आहेत. निवडणुकांचे बिगुल वाजताच आता विविध पक्षांकडून उमेदवारांच्या यादी जाहीर केल्या जात आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी  भाजपने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करत बाजी मारली आहे. महायुतीतील मोठा पक्ष आलेल्या भाजपने बाजी मारताना पहिल्या यादीत 99 उमेदवार जाहीर केले आहेत. 

असे असताना राष्ट्रवादी अजित पवार  गटातून एक मोठी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज आपल्या राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी आज संध्याकाळ पर्यंत जाहीर  करणार असल्याची शक्यता आहे. हाती आलेल्या माहितीनुसार पहिल्या यादीत 32- 35 नाव असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर यादी जाहीर करण्यापूर्वीच अजित पवार उमेदवारी निश्चित असलेल्या आमदारांना एबी फॅार्मचे वाटप करत असल्याची माहितीही पुढे आली आहे.

अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 41 संभाव्य उमेदवार

1.अजितदादा पवार - बारामती 
2. छगन भुजबळ - येवला 
3. हसन मुश्रीफ-कागल
4. धनंजय मुंडे - परळी 
5. नरहरी झिरवाळ - दिंडोरी 
6. अनिल पाटील - अमळनेर 
7.राजू कारेमोरे - तुमसर 
8. मनोहर चंद्रीकापुरे - अर्जुनी मोरगाव 
9. धर्मरावबाबा आत्राम - अहेरी 
10.इंद्रनील नाईक - पुसद
11. चंद्रकांत नवघरे - वसमत 
12. नितीन पवार - कळवण 
13. माणिकराव कोकाटे - सिन्नर 
14. दिलीप बनकर - निफाड 
15. सरोज अहिरे - देवळाली 
16. दौलत दरोडा - शहापूर 
17. अदिती तटकरे - श्रीवर्धन 
18. संजय बनसोडे - उदगीर
19. अतुल बेनके - जुन्नर 
20. दिलीप वळसे पाटील - आंबेगाव 
21. दिलीप मोहिते - खेड - आळंदी 
22. दत्तात्रय भरणे - इंदापूर 
23. यशवंत माने - मोहोळ 
24. सुनिल शेळके  - मावळ 
25. मकरंद पाटील - वाई
26. शेखर निकम  - चिपळूण 
27. अण्णा बनसोडे  - पिंपरी 
28. सुनिल टिंगरे - वडगाव शेरी 
29. राजेश पाटील - चंदगड 
30. चेतन तुपे - हडपसर 
31. किरण लहामटे - अकोले
32. संजय शिंदे - करमाळा 
33. देवेंद्र भुयार - मोर्शी 
34. आशुतोष काळे - कोपरगाव 
35 संग्राम जगताप - अहमदनगर शहर 
36. जयसिंह सोळंके - माजलगाव 
37. बाबासाहेब पाटील - अहमदपूर 
38. सना मलिक - अणुशक्तीनगर 
39. नवाब मलिक - शिवाजीनगर मानखुर्द 
40. अमरावती शहर - सुलभा खोडके 
41.इगतपुरी - हिरामण खोसकर

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group