राजकीय घडामोडींना वेग आल्याचं दिसून आलं. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक होणार असून या सर्व जागा स्थानाकि स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघातील आहेत. आजपासून अर्ज भरण्यास सुरूवात होणार असून त्याच पार्श्वभूमीवर आता महत्वाची अपडेट समोर आली आहे.
या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत जागावाटपावरून मोठी चर्चा आणि रस्सीखेच सुरू होती. अखेर दीर्घ चर्चेनंतर महायुतीत जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे.
आजपासून म्हणजेच 25 मे ते 1 जूनपर्यंत या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत असून 2 जून रोजी अर्जांची छाननी होईल. पुढील महिन्याच्या 22 तारखेला, म्हणजेच 22 जून रोजी विधान परिषदेसाठी निवडणूक पार पडणार आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, विधान परिषद निवडणुकीत भाजप 12 जागांवर निवडणूक लढवणार असून शिंदे गटाच्या शिवसेनेला 4 जागा, तर राष्ट्रवादी काँग्रेसला 1 जागा देण्यात येणार आहे.