महायुतीच्या मंत्रिमंडळाच खातेवाटप रखडल्याचे कारण काय ? नक्की काय घडतंय ?
महायुतीच्या मंत्रिमंडळाच खातेवाटप रखडल्याचे कारण काय ? नक्की काय घडतंय ?
img
दैनिक भ्रमर
काल सायंकाळी महायुती सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. पण विस्तार होऊन २४ तास उलटले तरी अजून खातेवाटप झालेले नाही. दरम्यान, अजूनही खातेवाटपाचा गुंता सुटला नाहीये का याची चांगलीच चर्चा  मिळतेय. ड्रमायन, आज संध्याकाळी महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक अपेक्षित होती. पण आता ही बैठक लांबणीवर पडल्याचं चित्र आहे. सध्या नागपुरमध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री वेगवेगळ्या कार्यक्रमात व्यस्त आहेत.

देवेंद्र फडणवीस खासदार महोत्सवात कुमार विश्वास यांच्या ‘अपने अपने राम’ या कार्यक्रमाला हजेरी लावली. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवगिरी बंगल्यावर आहेत. तर अजित पवारही शासकीय निवासस्थानी आहेत. बैठकीची वेळ निश्चित नाही पण रात्री उशीरा खातेवाटपासंदर्भात बैठकीची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान , शपथविधीनंतरच महायुतीतल्या आमदारांमध्ये कमालीची नाराजी पाहायला मिळाली . त्यामुळे खातेवाटपासंदर्भात काहीसं आस्ते कदमच धोरण अवलंबवलं असल्याची चर्चा आहे.  दरम्यान, उद्या मंगळवारी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे आणि शपथ घेऊनही मंत्री बिनखात्याचेच राहतील. त्यामुळे या  मंत्र्यांना खातं मिळायला आणखी किती उशीर होणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group