राजकीय बातमी : महायुतीच्या नव्या मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप ; कोणाला कोणता बंगला मिळाला वाचा सविस्तर
राजकीय बातमी : महायुतीच्या नव्या मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप ; कोणाला कोणता बंगला मिळाला वाचा सविस्तर
img
Dipali Ghadwaje
महायुती सरकारकडून खातेवाटप करण्यात आल्यानंतर आता नव्या मंत्र्यांना दालनांचे वाटप करण्यात आले. त्यापाठोपाठ आता नव्या मंत्र्यांना बंगल्यांचे देखील वाटप करण्यात आले आहे. काही मंत्र्यांना पूर्वीचे आहे तेच बंगले देण्यात आले आहेत. तर काहींच्या बंगल्यामध्ये बदल करण्यात आले आहेत. आधी मंत्रीपदावरून, नंतर खातेवाटपावरून काही नेत्यांमध्ये नाराजी होती. आता बंगले वाटपावरूनही काही मंत्र्यांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. कोणत्या मंत्र्याला कोणला बंगला मिळाला आहे ते आपण पाहणार आहोत. 

मंत्र्यांना मिळालेले नवे बंगले :

राधाकृष्ण विखे पाटील - रॉयलस्टोन बंगला
पंकजा मुंडे - पूर्णकुटी बंगला
चंद्रशेखर बावनकुळे - रामटेक बंगला
शंभुराज देसाई - मेघदूत बंगला
गणेश नाईक - पावनगड बंगला
धनंजय मुंडे - सातपुडा बंगला
चंद्रकांत पाटील - सिंहगड बंगला
राम शिंदे - ज्ञानेश्वरी बंगला
हसन मुश्रीफ - विशाळगड बंगला
गिरीश महाजन - सेवासदन बंगला
गुलाबराव पाटील - जेतवन बंगला
दादा भुसे - ब- ३ जंजीरा बंगला
संजय राठोड - शिवनेरी बंगला
मंगलप्रभात लोढा - ब-५ विजयदुर्ग बंगला
उदय सामंत - मुक्तागिरी बंगला
जयकुमार रावल चित्रकुट बंगला
अतुल सावे - अ- ३ शिवगड बंगला
अशोक उईके - अ-९ लोहगड
शंभूराजे देसाई - मेघदुत बंगला
आशिष शेलार - रत्नसिंधू बंगला
आदिती तटकरे- प्रतापगड बंगला
शिवेंद्रराजे भोसले - पन्हाळगड बंगला
माणिकराव कोकाटे - अंबर बंगला
जयकुमार गोरे - प्रचितीगड बंगला
नरहरी झिरवाळ - सुरूची ०९ बंगला
संजय सावकारे - अंबर-३२ बंगला
संजय शिरसाट- अंबर -३८ बंगला
प्रताप सरनाईक - अवंती - ५ बंगला
भरत गोगावले - सुरूचि- ०२ बंगला
मकरंद पाटील - सुरुचि- ०३ बंगला

कोणाला कोठे दालन? 


महायुती सरकारच्या ३३ मंत्र्यांना दालनाचे वाटप करण्यात आले आहे. बावनकुळे यांना मंत्रालय विस्तार इमारतीतील पहिल्या मजल्यावर ५ दालनांचे एक दालन देण्यात आले आहे. याच इमारतीत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे पाचव्या मजल्यावरील जुने दालन असणार आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकात पाटील यांचे तिसऱ्या मंजल्यावरील दालन कायम ठेवण्यात आले आहे.

गिरीष महाजनांसोबत मंगलप्रभात लोढा यांची देखील दालने आधी जी होती तिच ठेवण्यात आली आहेत. शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांना सातव्या मजल्यावर, गुलाबराव पाटील यांना चौथ्या मजल्यावर, संजय राठोड यांना पहिल्या मजल्यावर आणि उदय सामंत यांना पहिला मजल्यावर दालने देण्यात आली आहेत. 

मंत्री गणेश नाईक यांना पाचवा मजला, जयकुमार रावल यांना चौथा मजला, पंकजा मुंडे यांना चौथा मजला, अशोक उईके यांना पाचवा मजला, अॅड. आशीष शेलार यांना चौथा मजला, दत्तात्रय भरणे यांना तिसरा मजला, शिवेंद्रसिंह भोसले यांना सहावा मजला, माणिकराव कोकाटे यांना दुसरा मजला, जयकुमार गोरे यांना मुख्य इमारतीत पोटमाळा, नरहरी झिरवाळ यांना दुसरा मजला, संजय सावकारे यांना तिसरा मजल्यावर दालन देण्यात आले आहे.

तर, संजय शिरसाट यांना सातवा मजला, प्रताप सरनाईक यांना चौथा मजला, भरत गोगावले यांना तिसरा मजला, मकरंद पाटील यांना तिसरा मजला, नितेश राणे यांना मुख्य इमारतीत दोन क्रमांकाचा पोटमाळा, आकाश फुंडकर यांना विस्तार इमारतीत पहिला मजला, बाबासाहेब पाटील यांन पाचवा मजला, प्रकाश आबिटकर यांना विस्तार इमारतीत दुसरा मजला दालन म्हणून देण्यात आला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group