नाशिक पश्‍चिममध्ये ‘हिरे’ चमकल्या; मात्र, माजी महापौरांचे डिपॉझिट होणार जप्त
नाशिक पश्‍चिममध्ये ‘हिरे’ चमकल्या; मात्र, माजी महापौरांचे डिपॉझिट होणार जप्त
img
दैनिक भ्रमर


नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- विधानसभेच्या निवडणुकीत नाशिक पश्‍चिम मतदारसंघात मावळत्या आमदार सीमा हिरे चमकल्या. त्यांनी तब्बल 1 लाख 40 हजार 773 मते मिळविली, तर माजी महापौर दशरथ पाटील यांचे चक्क डिपॉझिट जप्त झाले आहे. त्यांना मतमोजणीच्या 30 फेर्‍या मिळून अवघी 1316 मते मिळाली आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा दशरथ पाटील राजकीय विजनवासात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सिडको, सातपूर आणि गंगापूर रोडचा काही भाग असा मतदारसंघ असलेल्या नाशिक पश्‍चिम विधानसभा मतदारसंघात आ. सीमा हिरे या पूर्वी दोनदा निवडून आल्या आहेत. आता त्यांनी सलग तिसर्‍यांदा विधानसभेत जाण्याची हॅटट्रिक साधली आहे. मतदारसंघातील सर्वच भागांत विकासकामे आणि सर्वांशी सौम्य तथा सौजन्यशील वागणूक, त्याचबरोबर हिरे घराण्याचा वारसा यामुळे सीमा हिरे पुन्हा निवडून येतील, याबद्दल अनेक मतदारांना खात्री होती. त्यात लाडक्या बहिणींनीही लक्षणीय भर घातली.

मतदानाची आकडेवारी पाहता सीमा हिरे या 1 लाख 40 हजार 773 मतांनी निवडून आल्या, तर त्यांचे प्रतिस्पर्धी उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांना 72 हजार 661 मते मिळाली. दिनकर पाटील यांना 46 हजार 390 मते मिळाल्याने मनसेचे इंजिन फक्त सातपूर भागातच चालल्याचे दिसून आले; मात्र दशरथ पाटील यांचा 1316 मतांचा आकडा त्यांना अद्यापही जनमताचा आधार नाही, हे दाखवून देत आहे.

Round No.Dinkar Patil Sudhakar BadgujarSeema Hiray
1272125043736
2113023975825
3530615323479
4102531496076
578028004805
6219321284372
7374920504093
8263820703471
9161529613943

1084334655168
1158424454757
1289625394002
13235617864225
14277217323835
15228026236020
1694624735516
17106028455807
1867524274830
1966625116201

2066130094391
2196128635347
2280923984604
23161323454587
2486521265291
25111621435221
26127624725394
27117620774497
28113724244356
29153730934413

30100412742512
Total4639072661140773


इतर बातम्या
सुहास कांदे यांचा

नाशिक जिल्ह्यात

Join Whatsapp Group