देवेंद्र फडणवीस एवढं काम करत असताना त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळतात ; नेमकं काय म्हणाले उदयनराजे भोसले?
देवेंद्र फडणवीस एवढं काम करत असताना त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळतात ; नेमकं काय म्हणाले उदयनराजे भोसले?
img
DB
सातारा : कराड-उत्तरचे भाजप उमेदवार मनोज घोरपडे यांच्या प्रचारार्थ पाल, कराड येथे जाहीर सभेची आयोजन करण्यात आले होते. यावेळी "देवेंद्रजी एवढं काम करत असताना त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या येतात. आपण त्यांच्या पाठिशी उभं राहिलं पाहिजे. आपण त्यांच्या पाठिशी उभं नाही, राहायचं तर कोणाच्या पाठिशी उभं राहायचं?" असं आवाहन साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केलं.  

 काय म्हणाले उदयनराजे भोसले?

महायुतीची प्रगती सुरु आहे. चांगल्या योजना राबवल्या आहेत. जो काम करतो त्याला ठेस लागते. हे लोक फक्त नाकार्तेपणा लपवण्यासाठी चिखल फेक करतात, व्यक्ती दोषावर बोलतात. देवेंद्र फडणवीस एवढं काम करत असताना त्यांना धमक्या मिळतात. जीवे मारण्याच्या धमक्या येतात. आपण यांच्या पाठीशी उभे रहायचे नाही तर कोणाच्या समोर उभे रहायचे? असा सवालही उदयनराजे यांनी केला. 

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group