मंत्रिमंडळ विस्ताराबाबत घडामोडींना वेग ; कोणत्या पक्षाचे किती जण होणार मंत्री? वाचा
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत घडामोडींना वेग ; कोणत्या पक्षाचे किती जण होणार मंत्री? वाचा
img
Dipali Ghadwaje
मुंबई :  राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस गुरुवारी मुख्यंमत्री पदाची शपथ घेतली तर, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आता यानंतर सर्वांचं लक्ष लागले आहे ते म्हणजे मंत्रिमंडळ विस्ताराकडे.

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधीनंतर मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा सुरू झाली आहे. हंगामी अध्यक्षांची निवड झाल्यानंतर नवनिर्वाचित आमदारांना विधीमंडळ सदस्यत्वाची शपथ देण्यात येणार आहे.

त्यानंतर विधानसभा अध्यक्षांची निवड होणार आहे. 7,8 डिसेंबर रोजी नवनिर्वाचित आमदारांची शपथ होईल. त्यानंतर 9 डिसेंबर रोजी विधानसभा अध्यक्षांची निवड होण्याची शक्यता आहे.

मंत्रिमंडळाचा विस्तार कधी?

महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार हा 11 किंवा 12 डिसेंबर रोजी होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ खाते वाटपाबाबतची चर्चा जवळपास पूर्ण झाली आहे. मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचे 11 ते 12 मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती आहे. तर, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे 9 ते 10 आमदार आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 8 ते 9 आमदार हे मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे.

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत येत्या दोन दिवसात महायुतीचे किती मंत्री विस्तारात शपथ घेणार यावर अंतिम निर्णय होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे महायुतीचे प्रमुख एकत्रित बसून शपथ घेणार आहेत.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group