भिवंडीत धर्मांतराचा प्रकार ? अमेरिकन नागरिकासह तिघे अटकेत
भिवंडीत धर्मांतराचा प्रकार ? अमेरिकन नागरिकासह तिघे अटकेत
img
वैष्णवी सांगळे
भिवंडी तालुक्यातील भुईशेत चिंबीपाडा येथे धर्मांतर केले जात असल्याचा आरोप हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी केला आहे. या परिसरात ख्रिस्ती लोकांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी गावातील महिला, पुरुष आणि लहान मुलांना प्रार्थनेसाठी बोलावून आरोपी ख्रिस्ती धर्माचा प्रसार करत असल्याची बाब हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आली. रविनाथ भुरकुट यांनी तक्रार केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.


एका अमेरिकन नागरिकानं आमिष दाखवत धर्माचा प्रचार करत असल्याचे उघडकीस आले आहे. हा व्यक्ती बिझनेस व्हिजाच्या माध्यमातून अमेरिकेतून भारतात आलेला होता. याप्रकरणी भिवंडी तालुका ग्रामीण पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून अमेरिकन नागरिकासह तिघांना अटक केली आहे. साईनाथ गणपती सरपे (वय 42 , रा. गोखीवरे, ता. वसई, जि. पालघर), जेम्स वॉटसन (वय 58, सध्या रा. हिरानंदानी ईस्टेट, ठाणे (प), मूळ रहिवासी अमेरिका), मनोज गोविंद कोल्हा (वय-35 , रा. भुईशेत, चिंबीपाडा, ता. भिवंडी) असे अटक केलेल्या आरोपींची नावे असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार रविनाथ सावजी भुरकूट हे भिवंडी तालुक्यातील गावात राहतात. त्यांच्या शेजारच्या गावात राहणारा आरोपी मनोज गोविंद कोल्हा याच्या घरासमोरील मोकळ्या जागेमध्ये ३ ओक्टोबर रोजी सकाळच्या सुमरास आरोपी जेम्स वॉटसन याच्या उपस्थितीत प्रार्थनेचा कार्यक्रम स्रुरू होता. या ठिकाणी अंदाजे ३५ लोक प्रार्थनेसाठी जमले.

आरोपींनी सोबत आणलेली पुस्तके वाचून दाखवून त्याद्वारे प्रार्थनेचा तसेच धर्माचा प्रचार करत असल्याचे दिसून आले. विविध आमिष दाखवुन अंधश्रद्धा पसरवली. तसेच काही मुलांना जबरदस्तीने तेथे थांबवून ठेवून अमेरिकन नागरिकानं त्यांच्या कपाळावर हात ठेवून त्यांना दैवीशक्तीचा वापर करुन मी तुमच्यावर उपचार केला आहे, असे सांगून अल्पवयीन मुलांबाबत गैरकृत्य केलं, असे तक्रारीत नमूद केलं आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा आता अधिक तपास सुरू केला आहे.?
इतर बातम्या
Join Whatsapp Group