महाराष्ट्रात खळबळ ! माजी महापौराला अटक , नेमकं प्रकरण काय ?
महाराष्ट्रात खळबळ ! माजी महापौराला अटक , नेमकं प्रकरण काय ?
img
वैष्णवी सांगळे
मोठी बातमी समोर आली आहे. भिवंडी महापालिका महापौरपदाचा तिढा अद्याप सुटला नाही, महापौरपदी कोण विराजमान होणार याची चर्चा सुरु असतानाच माजी महापौर, आणि कोणार्क विकास आघाडीचे संस्थापक विलास पाटील यांनी ठाणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) अटक केली आहे. या प्रकरणात आणखी काही जणांची नावे समोर येण्याची शक्यता आहे. 

भिवंडी न्यायालयात त्यांना हजर करण्यात आले आहे. मध्यरात्री पाटील यांना गुन्हा शाखेने बेड्या ठोकल्या. आज न्यायालयात त्यांना हजर करण्यात आले. २००५ मधील प्रकरणात पाटलांवर कारवाई झाली. भिवंडी महापालिका निवडणुकीत 'किंगमेकर' ठरण्याची क्षमता असलेले कोणार्क विकास आघाडीचे प्रमुख आणि माजी महापौर विलास पाटील यांना ठाणे आर्थिक गुन्हे शाखेने रात्री उशिरा अटक केली. या अटकेमुळे भिवंडीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. 

विलास पाटील यांच्यावर घरांच्या नावाखाली अनेकांची फसवणूक केल्याचा गुन्हा २०२५ मध्ये दाखल झाला होता. याच प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. महापौरपदाची निवडणुकीत विलास पाटील यांची कोणार्क आघाडी शिवसेनेला (एकनाथ शिंदे गट) पाठिंबा देणार असल्याची जोरदार चर्चा होती. त्याआधीच त्यांना अटक करण्यात आली. काही दिवसांपूर्वीच विलास पाटील आणि भाजप आमदार महेश चौगुले यांच्यात रस्त्यावर मोठा राडा झाला होता. 

भिवंडी महापालिकेत कोणार्क विकास आघाडीचे ५ नगरसेवक आहेत. सत्ता स्थापनेसाठी लागणाऱ्या जादूई आकड्यासाठी या ५ नगरसेवकांचे समर्थन अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. पाटील यांच्या अटकेमुळे आता ही आघाडी कोणाच्या बाजूने उभी राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काँग्रेस आणि भाजपकडून भिवंडी महापालिकेवर सत्ता स्थापन करण्याचा दावा केला जाऊ शकतो.
इतर बातम्या
Join Whatsapp Group