"त्यांना पंतप्रधान व्हायचंय, ते सोशल मीडियाच्या आहारी गेलेत" ; अमित ठाकरेंचा वसंत मोरेंवर निशाणा
img
Dipali Ghadwaje
पुणे : "वसंत मोरे यांना पंतप्रधान व्हायचं आहे. ते सोशल मीडियाच्या आहारी गेले आहेत", अशी खोचक टिप्पणी मनसे नेते अमित ठाकरे  यांनी नुकतेच मनसेला जय महाराष्ट्र करत वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा निवडणूक लढणाऱ्या वसंत मोरे यांच्यावर केली आहे. ते बुधवारी पुण्यात बोलत होते. यावेळी अमित ठाकरे यांनी अनौपचारिक गप्पांच्या कार्यक्रमात अनेक राजकीय मुद्द्यांवर देखील भाष्य केले.

दरम्यान 'वसंत मोरेना पंतप्रधान व्हायचंय. ते सोशल मीडियाच्या आहारी गेलेत.', अशापद्धतीची टीका अमित ठाकरे यांनी केली आहे. पुणे दौऱ्यावर असलेल्या अमित ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना वसंत मोरेंवर  टीका केली आहे. याचसोबत यावेळी त्यांनी 'महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे यांना मुंबईत एकही जागा मिळणार नाही.', असे देखील वक्तव्य केले आहे.

अमित ठाकरे यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, '१७ तारखेला मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांची एकत्र सभा होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे यांना मुंबईत एकही जागा मिळणार नाही. त्यांच्याविरोधात वातावरण आहे.' तसंच, 'देशात पुन्हा मोदी सरकार येणार असून ३०० च्या आसपास जागा मिळतील. राज साहेबांनी कार्यकर्त्यांचा विचार करूनच बिनशर्थ पाठिंब्याचा निर्णय घेतला असेल.', असे मत त्यांनी व्यक्त केले.

अमित ठाकरे यांनी यावेळी मनसेतून बाहेर पडलेल्या वसंत मोरे यांच्यावर टीका केली. 'लोकसभा निवडणुकीत मनसेचे जे पदाधिकारी महायुतीविरोधात प्रचार करतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. वसंत मोरेना पंतप्रधान व्हायचंय. ते सोशल मीडियाच्या आहारी गेलेत.' अशी टीका करत अमित ठाकरे यांनी वसंत मोरे यांना सल्ला देखील दिला आहे. 'वसंत मोरे यांनी मनसेकडून पाठिंब्याची अपेक्षा करण्यापेक्षा राज साहेबांचा आदेश पाळावा. महायुतीच्या प्रचारात सहभागी व्हावे.', असे त्यांनी सांगितले.

इतर बातम्या
Join Whatsapp Group