दिंडोरी लोकसभा मतदारसंघात
दिंडोरी लोकसभा मतदारसंघात "इतके" टक्के मतदान; "अशी" आहे विधानसभा निहाय आकडेवारी
img
दैनिक भ्रमर
दिंडोरी लोकसभा मतदारसंघातही भाजप महायुतीच्या माजी खासदार व केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार आणि महाविकास आघाडीचे भास्कर भगरे यांच्यादरम्यान मुख्य लढत मानली जात आहे.

माकपाचे माजी आमदार जिवा पांडू गावित आणि भाजपचे माजी खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण यांनी माघार घेतल्यामुळे निवडणुकीतील मातब्बर उमेदवारांची संख्या कमी झाली असली, तरी यंदा केंद्र शासनाने कांदा निर्यातबंदी केली. ती उठविल्यानंतरही मोठ्या प्रमाणात निर्यातशुल्क ठेवले. त्यामुळे कांदा निर्यात परवडणारी नव्हती. या मुद्यावर डॉ. भारती पवार यांची मते किती कमी होतात, की मोदी लाटेचा फायदा यावेळीही होतो, हे निकालाच्या दिवशीच स्पष्ट होणार आहे.

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात 18 लाख 53 हजार 387, तर नाशिक लोकसभा मतदारसंघात 20 लाख 30 हजार 124 इतकी मतदारसंख्या होती. 

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात 62.66 टक्के मतदान झाले. त्यात नांदगाव 55.10 टक्के, कळवण 63.45 टक्के, चांदवड 66.02 टक्के, येवला 63.2 टक्के, निफाड 62.76 टक्के, दिंडोरीत 66 टक्के मतदान झाले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group