नागरिकांना सावधानतेचा इशारा; करंजवण धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु
नागरिकांना सावधानतेचा इशारा; करंजवण धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु
img
वैष्णवी सांगळे
दैनिक भ्रमर : नाशिक जिल्हयात विविध ठिकाणी जोरदार पाऊस आणि धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्याने, प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. मुसळधार पावसामुळे नद्या आणि नाल्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. पार्श्वभूमीवर दिंडोरी तालुक्यातील करंजवण धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे, त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. 

हृदयद्रावक ! एकाच कुटुंबातील 5 जणांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

आज २० ऑगस्ट २०२५ रोजी करंजवन धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची संततधार चालू असल्यामुळे करंजवण धरण परीचालन सुची नुसार व धरणातील पाणी साठ्यातील होणारी झपाट्याने वाढ यामुळे जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ पातळीवर निर्णय होऊन करंजवन धरणातून कादवा नदीमध्ये विसर्ग प्रवाहित करण्यात येत आहे. तसेच पुढील कालावधीत  धरणामधील आवक बघून टप्याटप्याने विसर्ग वाढवावा लागणार आहे. 

तरी कादवा नदीकाठच्या नागरीकांना प्रशासनाकडून आवाहन  करण्यात आले आहे की नदीप्रवाहात कोणीही जावू नये तसेच नदीकाठ लगतचे आपले पशु-धन, चीजवस्तु, शेतीमोटार पंप सुरक्षित स्थळी हलवण्यात यावे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group