हृदयद्रावक ! एकाच कुटुंबातील 5 जणांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू
हृदयद्रावक ! एकाच कुटुंबातील 5 जणांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू
img
वैष्णवी सांगळे
दैनिक भ्रमर : जळगावच्या एरंडोल तालुक्यातील वरखेडी गावात दुर्दैवी घटना घडली. या ठिकाणी एकाच कुटुंबातील पाच जणांचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. शेतात वन्यप्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी लावलेल्या एका अवैध तारेच्या कुंपणाला स्पर्श झाल्यामुळे हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वरखेडी गावातील एका शेतकऱ्याने आपल्या शेताभोवती वन्यजीवांच्या त्रासापासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी तारेचे कुंपण घालून त्यात धोकादायकपणे वीजप्रवाह सोडला होता. एकाच कुटुंबातील काही जण हे शेतात काम करण्यासाठी जात होते. सदस्यांना या कुंपणामध्ये वीजप्रवाह असल्याबद्दल कोणतीही कल्पना नव्हती. निष्काळजीपणाने केलेल्या या कृत्याचा परिणाम म्हणून एका क्षणात  ४० वर्षांच्या दोन महिला, ४५ वर्षांचा एक पुरुष, सहा वर्षांची एक मुलगी आणि आठ वर्षांचा एक मुलगा अशा एकूण पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

'दोन शून्यां’ची बेरीज शून्यच..., बेस्ट निवडणुकीतील पराभवानंतर ठाकरे बंधुंना भाजपचा चिमटा

हे कुटुंब आदिवासी पावरा समाजाचे होते अशी माहिती समोर आली आहे. या भीषण घटनेतून याच कुटुंबातील तीन वर्षांची एक मुलगी सुखरूप बचावली आहे. एकाच कुटुंबाची एका क्षणात झालेली ही वाताहत पाहून संपूर्ण गाव हळहळले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group