१ लाखाची लाच स्वीकारताना वायरमन ताब्यात
१ लाखाची लाच स्वीकारताना वायरमन ताब्यात
img
Dipali Ghadwaje
जळगाव : महावितरणने आकारलेल्या दंडाच्या रकमेत तडजोड करून देण्याचे सांगून पैशांची मागणी केली. या दरम्यान तक्रारदाराकडून १ लाख रुपयांची लाच स्वीकारताना जळगाव शहरात महावितरणमध्ये कंत्राटी वायरमन असलेल्या कर्मचाऱ्याला एसीबीने ताब्यात घेतले आहे.  

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, महावितरणमध्ये कंत्राटी वायरमन प्रशांत विकास जगताप (वय ३३) असे ताब्यात घेतलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. जळगाव शहरातील ५३ वर्षीय तक्रारदाराच्या घराचे बांधकाम पूर्ण झाले होते. नवीन घरासाठी वीज कनेक्शन जोडण्याकरिता मीटरसाठी अर्ज केला होता. परंतु अद्याप मीटर बसऊन मिळाले नव्हते.

दरम्यान त्यांच्या घराला महावितरणच्या पथकाने भेट देऊन त्यांना ४ लाख ६० हजार रुपये दंडाची रक्कम भरली, तरच वीज मीटर कनेक्शन मिळेल असा निरोप कंत्राटी वायरमन यांनी दिला होता. 

मोठी बातमी : मनमाडला इंधन टँकर चालक पुन्हा संपावर; सकाळपासून इंधन पुरवठा ठप्प

प्रकरण दाबण्यासाठी दीड लाखाची मागणी 
तक्रारदार यांनी कंत्राटी वायरमन यांची भेट घेऊन त्यांच्याशी बोलणी केली असता १ लाख ६० हजार रुपयांमध्ये प्रकरण मिटवतो; असे सांगून लाचेची मागणी केली होती. त्यानंतर तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून पंचासमक्ष पडताळणी केली असता कंत्राटी वायरमन यांनी तडजोडी अंती १ लाख ४० हजार रुपयांची मागणी करून पंचासमक्ष १ लाख रुपये रोजी स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. प्रशांत जगताप यांच्यावर शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group