नाशिक : 5 हजारांची लाच मागताना ग्रामविकास अधिकाऱ्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. डिगंबर जावळे, ग्रामविकास अधिकारी विवरे बु ता. रावेर असे लाच मागणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांना बँकेतून कर्ज काढण्यासाठी कागदपत्रांची आवश्यकता होती. त्याकरिता ग्रामपंचायत कार्यालयातून नमुना नंबर ८, फेरफार दाखला, चर्तुसिमा व ना हरकतचा दाखला इत्यादी कागदपत्र काढून दिल्याच्या मोबदल्यात जावळे यांनी प्रथम 10 हजार रुपयांची लाच मागितली होती. याबाबत तक्रारदार यांनी दि. 21/02/2024 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगांव येथे तक्रार दिली होती.
या तक्रारीची पंचा समक्ष पडताळणी केली असता यातील जावळे यांनी तक्रारदार यांना नमुना नंबर ८, फेरफार दाखला, चर्तुसिमा व ना हरकतचा दाखला इत्यादी कागदपत्र काढून दिल्याच्या मोबदल्यात प्रथम 10000 रुपयांची व तडजोडीअंती 5000 रुपयांची लाचेची मागणी करून सदरची लाच रक्कम मिळवण्याचा प्रयत्न केलताचे निष्पन्न झाले. म्हणुन आज जावळे यांचेवर निंभोरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी, उप अधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उप अधीक्षक सुहास देशमुख, एन. एन. जाधव, सफौ दिनेशसिंग पाटील, पोना बाळू मराठे, पोकॉ राकेश दुसाने, पोकॉ अमोल सूर्यवंशी, पोकॉ सचिन चाटे, अमोल वालझाडे, पोलीस निरीक्षक , चासफौ सुरेश पाटील, पोना किशोर महाजन, पो.कॉ. प्रदीप पोळ, पोकॉ प्रणेश ठाकुर यांनी केली.