नाशिक :- एक हजार रुपये लाच मागून तडजोडी अंती ८०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.
राजेंद्र अरविंद पाटील (वय 36) असे लाच घेणाऱ्या नवापूर येथील भूमी अभिलेख कार्यालयातील शिपायाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, यातील तक्रारदार यांनी दिनांक 13/08/2025 रोजी लेखी तक्रार दिली की, तक्रारदार यांची शेतजमीन कुकराण, ता.नवापूर गावाचे वनक्षेत्रात आहे, सदर जमिनीचे हक्कासंबंधीचे चतु:सीमा, एकत्रीकरण व आकारबंदअशा दस्तऐवजांच्या नकला काढून देण्याच्या मोबदल्यात राजेंद्र पाटील यांनी तक्रारदार यांचेकडे 1000 रुपये लाचेची मागणी केली होती.
पाटील यांनी तडजोडअंती 800 रुपये स्विकारण्याचे मान्य करून काल भूमी अभिलेख कार्यालय, नवापूर येथे मागणी केलेली लाचेची रक्कम स्विकारताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.