ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्याला लाच घेताना अटक
ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्याला लाच घेताना अटक
img
दैनिक भ्रमर
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- साक्री तालुक्यातील पंचायत समितीमधील ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्याला एक हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.

परेश प्रदीपराव शिंदे (वय 34) असे लाच घेणाऱ्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, की यातील तक्रारदार यांना शासनाच्या शबरी आवास योजनेअंतर्गत घर बांधायचे आहे. तक्रारदार यांना या योजनेअंतर्गत अनुदानित निधी प्राप्त करण्याकरिता परेश शिंदे यांच्याकडून तक्रारदार यांच्या घराच्या बांधकामाचे फोटोज, तसेच पाहणी केल्याचा अहवाल साक्री पंचायत समितीत सादर होणे आवश्यक होते.  ही प्रक्रिया पूर्ण करून देण्यासाठी शिंदे यांनी तक्रारदाराकडे एक हजार रुपयांची लाच मागितली. ही रक्कम स्वीकारताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी, उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक अभिषेक पाटील, पोलीस निरीक्षक रूपाली खांडवी, पो. हवा. राजन कदम, मुकेश अहिरे, पो. ना. संतोष पावरा, पो. शि. प्रशांत बागूल, रामदास बरेला, पो. हवा. सुधीर मोरे यांनी केली.

इतर बातम्या
नाशिक जिल्ह्यात

Join Whatsapp Group