महावितरणचे नाशिक जिल्ह्यात
महावितरणचे नाशिक जिल्ह्यात "इतक्या" लाख ग्राहकांकडे थकले २४३ कोटी रुपये
img
दैनिक भ्रमर


 नाशिक : नाशिक जिल्ह्यात ३ लाख २७ हजार ग्राहकांकडे २४३ कोटी १५ लाख रुपये थकबाकी असून थकबाकीदार ग्राहकांचा नियमानुसार वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरु आहे.

वीजबिलाचा भरणा करणे अधिक सुलभ व्हावे, यासाठी नाशिक जिल्ह्यातील शनिवार व रविवारी २८ व २९ सप्टेंबर २०२४ या साप्ताहिक सुटीच्या दिवशीही अधिकृत वीजबिल भरणा केंद्र सुरु असणार आहे. सुविधेसह डिजिटल माध्यमातून ग्राहकांनी आपल्या चालू व थकीत वीजबिलाचा भरणा करून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.
 
नाशिक जिल्ह्यातील नाशिक व मालेगांव मंडळात २ लाख ७७ हजार ५०० घरगुती ग्राहकांकडे ३२ कोटी ७८ लाख रुपये, ३३ हजार ३७६ वाणिज्यीक ग्राहकांकडे ११ कोटी ९४ लाख, ४ हजार ५०२ औद्योगिक ग्राहकांकडे ६ कोटी ३५ लाख, ४ हजार ६५ पथदिवे ग्राहकांकडे १३० कोटी ३४ लाख, २ हजार १२ पाणीपुरवठा ग्राहकांकडे ५७ कोटी २२ लाख, ३ हजार ८९० सार्वजनिक सेवा ग्राहकांकडे ३ कोटी ९९ लाख आणि इतर १६६० ग्राहकांकडे ५२ लाख रुपये थकबाकी आहे. अशी एकूण जिल्ह्यात ३ लाख २७ हजार ५ ग्राहकांकडे २४३ कोटी १५ लाख रुपये थकबाकी असून थकबाकीदार ग्राहकांविरुद्ध वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरु आहे. 

     ग्राहकांच्या सोयीसाठी वीजबिल भरणा केंद्र सुरु ठेवण्यासोबतच थकीत वीजबिल वसुलीसाठीची कारवाई सुट्टीच्या दिवशी सुरु राहणार आहे. थकबाकीदार ग्राहकांनी वीज पुरवठा खंडित होण्याची कटू कारवाई टाळण्यासाठी आपल्या विदुयत बिलाचा भरणा वेळेत करावा.

अधिकृत वीजबिल भरणा केंद्राशिवाय महावितरणच्या मोबाईल अँप (App) वर वीजबिल भरणा तसेच इतर सर्व सुविधा उपलब्ध आहेत. www.mahadiscom.in या संकेतस्थळावर केवळ बारा अंकी ग्राहक क्रमांक नमूद करून नेट बँकिंग, डेबिट किंवा क्रेडिट कार्ड आदींच्या माध्यमातून वीजबिल भरता येते.

याशिवाय बाजारात उपलब्ध असलेल्या विविध पेमेंट वॉलेटचा (पेटीएम, गूगल पे) उपयोग करून घरबसल्या वीजबिलाचा ऑनलाईन भरणा करण्याची सुविधा आहे. तसेच वीजबिलावर दिलेला क्यूआर कोड स्कॅन करूनही थेट पेमेंट गेटवेवर जाऊन वीजबिल भरणे सुलभ होते, या डिजिटल माध्यमांचा वापर करून घरबसल्या वीजबिल भरता येईल.

अखंडित वीज सेवेसाठी उपलब्ध सुविधांचा उपयोग करून चालू व थकीत वीजबिलाचा भरणा करावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group