हृदयद्रावक ! अष्टमीची पूजा करून परतताना कुटुंबावर काळाचा घाला; आई- मुलाचा मृत्यू तर...
हृदयद्रावक ! अष्टमीची पूजा करून परतताना कुटुंबावर काळाचा घाला; आई- मुलाचा मृत्यू तर...
img
दैनिक भ्रमर
जळगाव तालुक्यातील विदगाव येथील तापी नदीच्या पुलावर हृदयद्रावक घटना घडली आहे. अष्टमीची पूजा करून परतताना भीषण अपघात झालाय. तापी नदीच्या पुलावर सुसाट वाळूच्या डंपरने कारला जोरदार धडक दिली. यामुळे कार पुलाचा कठडा तोडून थेट नदीत कोसळली. यात माय लेकाचा मृत्यू झाला आहे. तर कारचालक असलेले शिक्षक व त्यांचा लहान मुलगा गंभीर जखमी झाले आहे. 


जळगाव तालुक्यातील विदगाव येथील तापी नदीच्या पुलावर हा भीषण अपघात झाला आहे. यात मीनाक्षी चौधरी (वय ४०) आणि मुलगा पार्थ चौधरी यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान जळगाव शहरातील विठ्ठलवाडी परिसरात वास्तव्यास असलेले नीलेश चौधरी (वय ४५) हे धानोरा येथील शाळेत शिक्षक असून, त्यांच्या पत्नी मीनाक्षी चौधरी शिवाजीनगरमधील पाटणकर शाळेत शिक्षिका आहेत. शिक्षक दांपत्य हे मुलगा पार्थ (वय १२) आणि ध्रुव (वय ६) यांच्यासह कारने चोपडा येथे नातेवाइकांकडे अष्टमीच्या पूजेसाठी गेले होते. पूजेनंतर जेवण आटोपून चौधरी कुटुंब मुलांसह जळगावला येण्यासाठी निघाले. 

रात्री अकराच्या सुमारास विदगाव जवळील तापी नदी पुलावर कारला समोरून आलेल्या सुसाट डंपरने जोरदार धडक दिली. यामुळे कार कठडा तोडून खाली कोसळली. यात मायलेकाचा जागीच मृत्यू झाला होता. कार कोसळल्याने अपघाताच्या आवाजाने विदगावातील तरुण अपघातस्थळी आले. तसेच रस्त्यावरील वाहन धारकांसह ग्रामस्थ मदतीला सरसावले. यानंतर कारमधील चौघांना बाहेर काढण्यात आले. 

पुलावरून कोसळलेली कार नदीकाठावरील खडक आणि झुडपात पडली होती. यावेळी ग्रामस्थांनी कारमधील चिमुरडा ध्रुव तसेच त्याचे वडील नीलेश यांना जखमी अवस्थेत बाहेर काढत लागलीच जळगावात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर मीनाक्षी चौधरी आणि मोठा मुलगा पार्थ या दोघांचा कारमध्येच मृत्यू झाला होता. मृतदेह बाहेर काढून खासगी वाहनाने जिल्‍हा रुग्णालयात रवाना करण्यात आले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group