धक्कादायक ! 'तो हसून बोलायचा, प्रेमाने जवळ यायचा, संबंध ठेवायचा अन्...  ऐकून तुम्हालाही हादरा बसेल
धक्कादायक ! 'तो हसून बोलायचा, प्रेमाने जवळ यायचा, संबंध ठेवायचा अन्... ऐकून तुम्हालाही हादरा बसेल
img
वैष्णवी सांगळे
जळगाव जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जळगाव पोलिसांनी एका सिरीयल किलरचा ताब्यात घेतलं आहे. या नराधमाने दीड महिन्यात दोन महिलांची हत्या केली इतकंच नव्हे तर आणखी एका महिलेला जाळ्यात अडकवण्याच्या तयारीत होता. या महिलेचीदेखील हत्या करण्याच्या प्रयत्नात असल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्रात सीरियल किलरचा प्रकार समोर आल्याचे एकच खळबळ उडाली आहे.

खळबळजनक ! शिक्षिकाच करायची अल्पवयीन विद्यार्थ्याला अश्लील व्हिडिओ कॉल, वैतागून विद्यार्थ्याने...

महिलांची हत्या करणाऱ्या आरोपी अनिल संदानशिव याला पोलिसांनी अटक केली असून तो पोलीस कोठडीत आहे. अनिल हा विवाहित महिलांना लक्ष्य करायचा. तो त्यांच्याशी सुरुवातीला गोड बोलायचा. एकदा या महिलांचा विश्वास जिंकला की तो त्यांना घेऊन फिरायला जायचा. अनिल एकदम शांत जंगलात या महिलांना घेऊन जाऊन त्यांच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करायचा. स्वत:च्या सर्व इच्छा पूर्ण झाल्यानंतर तो महिलांची हत्या करायचा. कोणालाही मृतदेह सापडू नये म्हणून तो जंगलात फेकून द्यायचा. 

'समाजातील नामर्द याला फॉलो करतात...'; अनिरुद्धाचार्यांच्या 'त्या' वक्तव्याने दिशा पाटनीची बहीण संतापली

आरोपी अनिल संदानशिव याने अशाच प्रकारे इतरही महिलांची हत्या केली असावी? या शक्यतेच्या अनुषंगाने जंगल परिसरात शोध मोहीम राबवली जात आहे. 
शोध मोहिमेत जंगल परिसरात आणखी काही संशयास्पद आढळून येते का या दृष्टिकोनातून पोलीस पाहणी करत आहेत. ज्या जंगलात दोन महिलांच्या हत्या झाल्या, त्याच संपूर्ण जंगलामध्ये भर पावसामध्ये अमळनेर पोलिस सर्च ऑपरेशन राबवत आहे. आणखी काही महिलांचे मृतदेह किंवा मृतदेहाचे अवशेष सापडतात का ? या अनुषंगाने पोलीस अधिक तपास करत आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group