नाशिक : महावितरणच्या नाशिक शहर विभाग २ अंतर्गत असलेल्या उपनगर विद्युत उपकेंद्रातून निघणार्या दोन ११ केव्ही विद्युत वाहिनीला लागणार्या झाडांच्या फांद्या काढण्यासाठी तसेच विद्युत यंत्रणेच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी उपनगर विद्युत वाहिनीवरील भागांचा उद्या (दि. ६) रोजी दुपारी १२ ते ४ वाजेदरम्यान विद्युत पुरवठा टप्प्याटप्याने बंद असणार आहे. ग्राहकांनी याची नोंद घ्यावी व सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
३३/११ केव्ही उपनगर विद्युत उपकेंद्र येथून वीज पुरवठा करणाऱ्या नाशिक उपनगर भागातील खालील परिसराचा समावेश आहे :
१) ११ केव्ही इच्छामणी वाहिनीवरील पगारे मळा, अयोध्या नगर, इच्छामणी मंदिर परिसर, सिंधी कॉलनी, खोडदे नगर, व्यापारी बँक परिसर, आम्रपाली, शांती पार्क, श्रम नगर, नंदन व्हॅली, महारुद्र कॉलनी, रघुवीर कॉलनी आणि जुनी चाळ.
२) ११ केव्ही नाशिक रोड वाहिनीवरील नाशिक पुणे रोड, उपनगर पोलिस स्टेशन, आयएसपी क्वार्टर आणि एक्झिक्यूटिव्ह अपार्टमेंट परिसर असणार आहे.