20 हजारांची लाच घेताना येवला नगरपरिषदेचा कंत्राटी कर्मचारी जाळ्यात
20 हजारांची लाच घेताना येवला नगरपरिषदेचा कंत्राटी कर्मचारी जाळ्यात
img
DB
येवला :  20 हजारांची लाच घेताना येवला नगरपरिषदेच्या नगर रचना विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. आकाश रविंद्र गायकवाड (वय २२, रा. मु. गवंडगांव पो. सुरेगांव ता. येवला जि. नाशिक) असे लाच घेणाऱ्याचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, यातील आरोपी हे कंत्राटी कर्मचारी आहे. गायकवाड यांनी तक्रारदार यांचे समाजाचे पडित जागेची तात्पुरती बिनशेतीची परवानगी कामकाज  मुख्याधिकारी व लिपीक यांचेकडून करून देण्याचे मोबदल्यात तक्रारदार यांचेकडे स्वतासाठी ३०,००० रुपये लाचेची मागणी केली. अगोदर १०,००० रुपये दिले आहेत म्हणून उर्वरीत २०,००० रुपये काल येवला नगर लपरिषद कार्यालयातील नगर रचना विभागात स्विकारले म्हणून आरोपी मजकूर यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्वप्नील राजपूत, पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, पोहवा प्रभाकर गवळी, पोहवा प्रफूल्ल माळी, पोहवा संतोष गांगुर्डे, परशुराम जाधव, पोना किरण धुळे, पोना विलास निकम यांनी केली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group