येवला तालुक्यामध्ये शिवसेना शिंदे गटाने ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. येथील हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीतले जुने शिवसैनिक ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख किशोर सोनवणे यांचा शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश झाला आहे.
अंदरसुल येथील ग्रामपंचायत सदस्य ठाकरे गटाचे उपतालुकाप्रमुख अमोल सोनवणे, किशोर बागुल, संतोष वल्टे, संदीप शेळके आदींचा शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी संपर्कप्रमुख सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाने येथील तालुकाप्रमुख पांडुरंग शेळके यांच्या नेतृत्वामध्ये मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी हा प्रवेश करण्यात आला.
प्रथम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा येवला तालुक्याच्या वतीने तालुकाप्रमुख पांडुरंग शेळके यांनी सत्कार केला.तालुक्यामध्ये अनेक आजी-माजी शिवसैनिक शिवसेनेच्या शिंदे गटामध्ये प्रवेश करत आहे. किशोर सोनवणे यांच्या प्रवेशामुळे शहर व ग्रामीण भागातील काही जुने शिवसैनिक अजून शिंदे गटात दाखल होण्याचे अंदाज वर्तवले जात आहे. तसेच अंदरसुल गटामध्ये अमोल सोनवणे यांनी प्रवेश केल्यामुळे तिथे देखील पक्षाची ताकद वाढलेली आहे.
त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अजून किती प्रवेश होता आणि पक्षाला कुठले चेहरे मिळतात हे बघन आता महत्त्वाचं असणार आहे.अजून देखील उर्वरित तालुक्याचा दौरा करून काही नव्या जुन्या चेहऱ्यांना चांगली संधी द्यायची आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हात बळकट करण्यासाठी प्रत्येक गाव खेडे पिंजून काढूनं निष्ठावान शिवसैनिकांना सन्मानाने पक्षात घेऊन त्यांना न्याय देण्याचं काम पक्षाच्या माध्यमातून करू असे तालुकाप्रमुख पांडुरंग शेळके पाटील यांनी यावेळी सांगितले.