राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मुंबई पथकाची येवल्यात धडक कारवाई ; सव्वा कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मुंबई पथकाची येवल्यात धडक कारवाई ; सव्वा कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त
img
Dipali Ghadwaje
महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक मुंबई यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे येवला तालुका हद्दीत असलेल्या पिंपळगाव जलाल टोल नाका परिसरामध्ये एक ॲसिड वाहतूक करणाऱ्या टँकरच्या कप्प्यामध्ये दुसऱ्या राज्यात विक्री होत असलेल्या मद्याची चोरीछुप्या पद्धतीने वाहतूक होत , असून मुंबई पथकाने येवला पथकासह या ठिकाणी सापळा रचून टँकर ताब्यात घेतला आहे. 

या टँकरमध्ये परराज्यात विक्री होणारे देशी-विदेशी मद्य असा एकूण एक कोटी 21 लाख 53 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास येवला उत्पादक शुल्क विभाग करत आहे.

दरम्यान एका आरोपीला उत्पादन शुल्क विभागाने ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group