२५ ऑगस्ट २०२४
येवला प्रतिनिधी दीपक सोनवणे : येवल्याचे शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी दोन दिवसांपूर्वी मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. या संदर्भात एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या व्हिडिओ संदर्भात येवल्यातील गणेश गवळी यांनी समर्थकांच्या भावना दुखावतील अशी पोस्ट टाकल्याने प्रतीक जाधव यांच्या तक्रारीवरून येवला शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बोरसे हे करत आहेत.
Copyright ©2026 Bhramar