येवल्यात तीन दिवसीय संक्रांत उत्सवाला मोठ्या जल्लोषात सुरुवात झाली आहे मात्र संक्रांतीच्या पूर्वसंध्येला संक्रांत उत्सवाला गालबोट लागले , असून तीन विविध घटनांमध्ये पाच वर्षाच्या चिमुकल्यासह दोन तरुणांचे गळे कापून एकूण 3 जण गंभीर जखमी झाले आहेत देवराज दीपक कोटमे वय 5 या चिमुकल्याच्या गळ्याला नायलॉन माझ्यामुळे इजा होऊन 14 टाके पडले आहेत.
यानंतर शुभम सजन पवार यांच्या गळ्याला देखील नायलॉन मांजा मुळे इजा होवून 20 टाके पडले आहेत. तिसऱ्या घटनेत अंदरसुल येथील दीपक राऊळ या तरुणाच्या गळ्याला मांजा अडकून तो जखमी झाल्याने त्यालाही 20 टाके पडले आहेत.
या तीन घटनांमुळे बंदी असलेला नायलॉन मांजा येवल्यात सर्रास वापरला जात असल्याचा समोर आला आहे प्रशासन यावर केव्हा कारवाई करणार हा सवाल आता निर्माण झाला आहे.