येवला : सध्या येवला शहरात जनवरांमध्ये लंपी आजाराने थैमान घातले असून वेळीच यावर उपाययोजना करण्याच्या हेतूने पालिका प्रशासन खडबडून जागी झाली आहे. शहरात लंपी संसर्गजन्य ग्रस्त जनावरांचे वाढते प्रमाण व मृत्यू शहरवासियांच्या चिंतेत भर घालणारी आहे.
त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या पार्श्वभूमीवर येवला पालिका प्रशासनाने तत्काळ लक्ष घालुन पुढील विचार विनिमयासाठी गोरक्षक व सामाजिक कार्यकर्ते यांच्याबरोबर पालिका सभागृहात उपाय योजनेबाबत चर्चा विनिमय करण्यात आले.
यावेळी संबंधित पालिका प्रशासन पदाधिकारी व तालुका पशुवैद्यकीय अधिकारी यांच्यासह येवला शहरातील गोरक्षक व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते