येवला (रविंद्र करमासे) :- मराठ्यांचा संघर्ष योद्धा क्रांतीसुर्य मनोज पाटील जरांगे यांचे अंतरवेली सराटी या ठिकाणी प्राणांतिक उपोषण चालू आहे. त्यांची तब्येत खूप खूप खालावलेली आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी व मराठा आरक्षण मिळविण्यासाठी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज सायंकाळी ६ :३० वाजता सुरेगाव रस्ता येथे कॅण्डल मोर्चा काढण्यात आला आहे.
यावेळी पंचक्रोशीतील समाज बांधव, महिला, युवती,युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कॅण्डल मोर्चानंतर उपोषण स्थळी हभप श्रावण महाराज देवठाणकर यांचे मराठा आरक्षण या विषयावर जाहीर कीर्तन आयोजन करण्यात आले.