कोटमगाव येथे शारदीय नवरात्र उत्सवाला घटस्थापनेच्या पूजनाने सुरुवात
कोटमगाव येथे शारदीय नवरात्र उत्सवाला घटस्थापनेच्या पूजनाने सुरुवात
img
दैनिक भ्रमर

येवला (वार्ताहर):-साडेतीन शक्तीपीठाचा दर्जा असलेले येवला तालुक्यातील श्रीक्षेत्र कोटमगाव या ठिकाणी जगदंबा मातेचा यात्रोत्सव मोठ्या प्रमाणात होत असतो. या यात्रोत्सवाची सुरुवात जगदंबा मातेच्या मंदिरासमोर घटस्थापनेने केली जाते.

घटस्थापनेचे पूजन कोपरगाव संत जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती परमपूज्य रमेश गिरीजी महाराज यांच्या हस्ते संपन्न झाले.  मंत्रांच्या नामघोषामध्ये जगदंबा मातेचा जागर करण्यात आला.

याप्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष रावसाहेब कोटमे, विश्वस्त रामचंद्र लहरे, उपाध्यक्ष भाऊसाहेब आदमाने, सचिव दिलीप कोटमे, खजिनदार अंबादास भोसले, विश्वस्त अंबादास लहरे, गणेश कोटमे, डॉ. शंकर कोटमे, श्रीमती शुभदा दाणी, श्रीमती शैला कलंत्री, श्रीमती सुमनबाई कोटमे, व्यवस्थापक राजेंद्र कोटमे यांच्यासह गावातील ग्रामस्थ व यात्रेकरू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

इतर बातम्या
नाशिक जिल्ह्यात

Join Whatsapp Group