येवला तालुक्यात एकाच रात्री ३ ठिकाणी दरोडा; दरोडेखोरांना प्रतिकार करताना ७ जण जखमी
येवला तालुक्यात एकाच रात्री ३ ठिकाणी दरोडा; दरोडेखोरांना प्रतिकार करताना ७ जण जखमी
img
दैनिक भ्रमर

येवला :- मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास येवला तालुक्यातील नगरसुल येथे एकाच वेळी तीन ठिकाणी झालेल्या दरोड्यामुळे संपूर्ण तालुका हादरून गेला आहे.

नगरसुल- नांदगाव राज्य मार्गावर मनुबाई घाटाच्या अलीकडील शुक्लवस्ती व कमोदकर वस्तीवर दोन ठिकाणी सशस्त्र दरोडेखोरांनी जबरी दरोडा टाकून लाखोंचा मुद्देमाल, सोने-चांदी दागिने, रोख रक्कम लुटून नेला आहे. यात प्रतिकार करणाऱ्या सात जणांना दरोडेखोरांनी गंभीर जखमी केले आहे.

यातील राजकुमार रामजी शुक्ला यांच्या वस्तीवर पडलेल्या दरोड्यात अंदाजे सहा लाख रुपयांचा मुद्देमाल लुटून नेला आहे. राजकुमार रामजी शुक्ला यांना दरोडेखोरांनी बेदम मारहाण केली आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना येवल्यातील चंडालिया हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आलेले आहे.

उर्वरित कमोदकर वस्तीवरील अनिल बबन कमोदकर, बबन देवराम कमोदकर, नर्मदा बबन कमोदकर, व तेजस अनिल कमोदकर, सविता अनिल कमोदकर,व दत्तू दिलीप कमोदकर असे एकूण सहा जण हे ग्रामीण रुग्णालय नगरसुल येथे ऍडमिट आहेत. कमोदकर वस्तीवर पडलेल्या दरोड्यात किती रुपयांचा ऐवज गेला हे अद्याप समजू शकले नसून तालुका पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार हे आपल्या फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल झाले आहे. 

याप्रसंगी नगरसुलचे सरपंच निकेत पाटील, माजी सरपंच प्रसाद पाटील, ज्येष्ठ पत्रकार विनोद पाटील, सुनील पैठणकर आदींनी पोलिसांना सहकार्य केले. या घटनेचा तपास आता येवला तालुका पोलीस करत आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group