येवला (दिपक सोनवणे) :- राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी येवल्यातील संपर्क कार्यालय येथे फटाके फोडून जल्लोष साजरा केला.
निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ चिन्ह व पक्षाबाबत निर्णय घेत अजित पवार राष्ट्रवादी गटाला चिन्ह व पक्ष बहाल केल्यामुळे शरद पवार यांच्या गटाला मोठा धक्का बसला आहे.
हे वृत्त प्रसार माध्यमांवर झळकताच राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या येवल्यातील संपर्क कार्यालय येथे राष्ट्रवादी काँग्रेस व भुजबळ समर्थकांनी एकत्र येऊन फटाके फोडून जल्लोष साजरा केला.
याप्रसंगी भूषण लाघवे, महेश गादेकर, विशाल परदेशी, विकी बिवाल, गोटू मांजरे, सूमित थोरात, बापू जगदाळे, राकेश कुंभारे, आदित्य कानडे, दीपक पवार आदींसह भुजबळ समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.