येवल्यात कापड दुकानाला भीषण आग; ३ कारागिरांना वाचविण्यात यश
येवल्यात कापड दुकानाला भीषण आग; ३ कारागिरांना वाचविण्यात यश
img
दैनिक भ्रमर

येवला (वार्ताहर) :- शहरातील मेनरोड येथील कापड बाजारातील पारख क्लॉथ स्टोअर या कापड दुकानात रात्री 11.30 वाजेच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. या आगीत लाखो रुपयांची वित्तहानी झाली असून, दुकानात झोपलेल्या तीन कारागिरांना वाचविण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.

येवला शहरात मेनरोडवर कापड बाजार असून, त्या ठिकाणी पारख क्लॉथ सेंटर नावाचे साडीचे व रेडिमेड कापड दुकान आहे. रात्री दहाच्या सुमारास नेहमीप्रमाणे दुकानाचे मालक दुकान बंद करून गेले. रात्री साडेअकराच्या सुमारास दुकानातून अचानक धुराचे लोट बाहेर येताना काही नागरिकांना दिसले. त्यांनी आरडाओरडा केल्यामुळे परिसरातील नागरिक जागे झाले. यावेळी येवला अग्निशमन दलाच्या बंबाला पाचारण करण्यात आले; मात्र ही आग इतकी भीषण होती, की मनमाड व कोपरगाव येथील अग्निशमन दलांना पाचारण करावे लागले. सुमारे दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले आहे.


इतर बातम्या
नाशिक जिल्ह्यात

Join Whatsapp Group