
येवला (भ्रमर वार्ताहर) :- येवला तालुक्यातील महालखेडा दत्तवाडी शिवारात एका उसाच्या शेतामध्ये अंदाजे 35 ते 40 वर्षे वयोगटातील एका तरुणाचा दगडाने ठेचून निर्घृण खून झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, येवला तालुका पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. या घटनेबद्दल पोलीस तपासानंतर अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. परिसरातील नागरिकांमध्ये उलट सुलट चर्चा होत आहे.